सर्वेक्षणे/ स्पर्धा/ स्वयंसेवक नोंदणी

थेट वेबिनार

विश्वप्रार्थना, सामूहिक पसायदान पठण

विश्वप्रार्थना, सामूहिक पसायदान पठण

संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणासाठी दिलेले 'पसायदान' हे केवळ भक्तीपर पठण नसून, त्यामध्ये विश्वबंधुत्व, मानवतेची सेवा, अज्ञानाचा अंत आणि समतेचा सार्वत्रिक संदेश आहे. याच पावन हेतूने, माउलींच्या पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान भवानी पेठ येथे १० जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजता 'सामूहिक पसायदान पठण' आयोजित केले आहे. भवानी पेठ येथे काही भक्त प्रत्यक्ष उपस्थित राहतील, तर डिजिटल लिंकद्वारे देश-विदेशातील लाखो वारकरी या विश्वकल्याण प्रार्थनेत ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या वैश्विक प्रार्थनेचे मानकरी व्हा!